केईएम रुग्णालयातील छताचा भाग कोसळल्याने दोन रुग्ण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. केईएम रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असणा-या डायलिसीस विभागात ही दुर्घटना घडली . बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेत छत कोसळल्याने दोन रुग्ण आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान छत कोसळल्यामुळे डायलिसीस विभागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी डायलिसीस विभाग तात्पुरता दुस-या ठिकाणी हलवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधावारी रात्री ८.३० च्या सुमारास डायलिसीस विभागातील स्लॅबचा भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मोठी हानी टळली. दुर्घटनेत दोन रुग्ण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना खरचटलं आहे. इतर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी डायलिसीस युनिट दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत आहे.

Story img Loader