लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी संथ मतदान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदानाच्या दुसऱ्या फेरीअंती मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान सुरू असल्याचे निदर्शनास आले. मुंबई शहर जिल्ह्यातील शीव कोळीवाडा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १२.८२ टक्के मतदान झाले होते. तर सर्वाधिक मतदान मलबार हिल आणि माहीम मतदारसंघात अनुक्रमे १९.७७ टक्के आणि १९.६६ टक्के झाले होते. त्याच वेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ पैकी विक्रोळी आणि वर्सोवा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी सरासरी १५.५ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, दुसऱ्या सत्राअंती हळूहळू मतदान केंद्रांवर मतदान पोहोचू लागले असून काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा दिसू लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सर्वच मतदारसंघात विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मात्र काही मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक उपस्थिती होती. तर काही मतदारसंघांवर मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत होता. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी सकाळी मतदान केंद्रात मतदान करून मार्गस्थ होत होते. मात्र एकूणच मतदानाच्या पहिल्या फेरीत सकाळी १० वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर फारसे मतदार फिरकले नाहीत.
आणखी वाचा-मुंबई : मतदारांना निवडणूक केंद्रांवर नेण्यासाठी कार्यकर्त्यांची कसरत
मतदानाची दुसऱ्या फेरी सकाळी ११ वाजता पूर्ण झाली. या फेरीमध्येही मतदानाचा टक्का फारसा वाढलेला नाही. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई शहर जिल्ह्यातील शीव कोळीवाडा मतदारसंघात सरासरी १२.८२ टक्के, कुलाबा मतदारसंघात १३.०३ टक्के, धारावी मतदारसंघात १३.२८ टक्के, मतदान झाले. तर मुंबादेवी मतदारसंघात १४.४९ टक्के, वरळी मतदारसंघात १४.५९ टक्के, शिवडी मतदारसंघात १६.४९ टक्के, भायखळा मतदारसंघात १६.९८ टक्के, वडाळा मतदारसंघात १७.३३ टक्के, तर माहीम मतदारसंघात १९.६६, तर मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या दुसऱ्या फेरीअखेर मुंबई उपनगर जिल्ह्यातील विक्रेळी मतदारसंघात १५.५ टक्के. सर्वोवा मतदारसंघात मुलुंड मतदारसंघात १५.८ टक्के मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातअवघे १५.३८ टक्के मतदान झाले होते. तर सर्वाधिक मतदान भांडुप पश्चि मतदारसंघात २३.४२ टक्के, तर दहिसर मतदारसंघात २१.४९ टक्के झाले आहे.