संयम ठेवण्याचा मनोहर पर्रिकर यांचा सल्ला
माजी सैनिकांच्या एक श्रेणी, एक निवृत्तिवेतन या मागणीला केंद्र सरकारने मान्यता देण्याची घोषणा केली असली, तरी यातील तरतुदींबाबत माजी सैनिकांमध्ये संभ्रम कायम आहे. हा आठ रुपयांचा प्रश्न नसून आठ हजार कोटींचा आहे. म्हणून याबाबत स्पष्टता येण्यासाठी अंतिम आदेशाची वाट पाहा, असा सबुरीचा सल्ला संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिला आहे.
सैनिकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवृत्ती घेतल्यास ते ओआरओपीला पात्र ठरतील, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले होते. लोकांमध्ये याबाबत एवढी उत्सुकता कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत याबाबतचे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल, असे पर्रिकर म्हणाले.
तसेच स्वेच्छानिवृत्तीचा प्रकार सुरक्षा दलांमध्ये अस्तित्वात नाही. अनेक लोकांना आरोग्याच्या प्रश्नावरून लष्करातून काढून टाकण्यात येते. जर त्यांनी किमान सेवा बजावली नसेल तर ते निवृत्तिवेतनास पात्र ठरत नसल्याचे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader