कुलदीप घायवट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : रेल्वे गाड्यांमध्ये धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी शौचालयात बसवण्यात आलेली धूर शोधक यंत्रणा ‘टिश्यू पेपर’ने झाकून ती निष्क्रिय केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. शौचालयात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या अधिक असून, त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. मात्र, रेल्वे प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.
रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून रेल्वे डबे, विद्याुत डब्यांमध्ये (पॉवर कार) धूर शोधक व धूरशमन यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान रेल्वे डब्यांमध्ये १२ धूर शोधक आणि शमन यंत्रणा बसविण्यात आली. त्यात दोन स्वयंपाक डबे (पॅन्ट्री कार) व १० विद्याुत डबे (पॉवर कार) यांचा समावेश आहे. तर, नोव्हेंबर २०२३ मध्ये विविध डब्यांमध्ये ८८ धूर शोधक यंत्रणा बसवली आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान ४२० धूर शोधक यंत्रणा बसवली आहे. मात्र धूम्रपान करणारे प्रवासी ‘टिश्यू पेपर’ने धूर शोधक यंत्रणा झाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लाखो रुपये खर्चून प्रवाशांची सुरक्षेसाठी केलेली उपाययोजना फोल ठरत आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमधील धूर शोधक यंत्रणेची धूम्रपान करणाऱ्यांनी मोडतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा घटनामुळे अग्निसुरक्षा उपाययोजना अकार्यक्षम ठरत आहेत.
धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा बंद
शौचालयांतील धूर शोधक यंत्रणेच्या संपर्कात धूर आल्यानंतर धोक्याची सूचना देणारी यंत्रणा (अलार्म) वाजते. काही प्रवासी धूम्रपान करीत असल्याची रेल्वे कर्मचाऱ्यांना कल्पना असते. धुरामुळे यंत्रणेतील ‘अलार्म’ वाजून आवाज होऊ नये, यासाठी काही रेल्वे कर्मचारी तो बंद ठेवतात. पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ‘अलार्म’ बंद ठेवण्याचा प्रकार ‘राजधानी’सह इतर गाड्यांत सर्रासपणे होत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.