देशभरातील महिलांना आपल्या भूमिकेतून आदर्श पतीव्रतेचे धडे देणाऱ्या व त्या प्रतिमेच्या बळावर राजकारणात स्थान बनविणाऱ्या स्मृती इराणी हिने ‘डेली सोप मेकर’ एकता कपूर हिच्या आगामी कार्यक्रमामध्ये नायकिणीची भूमिका करण्यास नकार दिला आहे. आपल्या तयार झालेल्या प्रतिमेला छेद देणारी भूमिका करण्यासाठी स्मृती इराणी एकूणच नाखूष असल्याचे यावरून दिसून आले. दरम्यान, स्मृती इराणी हिने नाकारलेली भूमिका साक्षी तन्वर करणार असून, कार्यक्रमामध्ये स्मृती इराणी दुसऱ्या एका प्रतिमा जपणाऱ्या भूमिकेत दिसून येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवे काय?
एक थी नायिका या प्रसिद्धी मालिकेमध्ये अमना शरीफ, मौली गांगुली, श्वेता तिवारी, पूजा गौर आणि अंकिता लोखंडे आदी टीव्ही स्टार्सची प्रमुख भूमिकांमध्ये हजेरी असणार आहे. लाईफ ओके वाहिनीवर ही मालिका ९ मार्चपासून प्रसारित केली जाणार आहे. एखाद्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी छोटय़ा पडद्याचा अभिनव पद्धतीने वापर या मालिकेद्वारे पहिल्यांदाच होणार आहे.
झाले काय?
विशाल भारद्वाज यांच्या ‘एक थी डायन’ या मोठय़ा पडद्यावर दाखल होणाऱ्या आगामी चित्रपटाला प्रसिद्धीपूरक म्हणून छोटय़ा पडद्यावर प्रसिद्धीचे नवे तंत्र अवलंबण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक थी नायिका’ ही आठ भागांची थरार मालिका एकता कपूर सादर करणार आहे. या भागात नायकिणीच्या भूमिकेसाठी स्मृती इराणी हिने नकार दर्शविला. आत्तापर्यंत जनमानसामध्ये असलेल्या आपल्या प्रतिमेला तडा देण्यास नाखूष असल्यामुळे स्मृतीने ही भूमिका नाकारल्याचे बालाजी टेलिफिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी तनुज गर्ग यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani dont want to do leading role in serials