कोणताही सण आला की मित्र, मत्रिणी, आप्तेष्ट यांना शुभेच्छांचा एसएमएस पाठवायचा मोठा कार्यक्रमच गेली काही वर्षे भल्या सकाळपासून सुरू व्हायचा. लोकांची ही हौस लक्षात घेऊन मोबाइल सेवा कंपन्याही सणासुदीच्या काळात एसएमएसचे दर वाढवायच्या. पण ‘व्हॉट्स अप’च्या आगमनानंतर चित्रच पालटले असून त्यावर मोफत शुभेच्छा पाठवता येत असल्याने एसएमएसचा आवाज पुरता बंद झाला आहे.
यंदाच्या दिवाळीत शहरात एसएमएसची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पशांची, शब्दांची मर्यादा नसलेल्या व्हॉट्स अॅपने एसएमएसची बाजारपेठ पुरती कमी केली आहे. याचबरोबर यंदा दिवाळीच्या सुरुवातीला ‘व्हॉट्स अॅप’च्या जोडीला अन्ड्रोईड बीबीएम अॅपची भर पडली. यामुळे यंदा एसएमएसची जागा ‘मेसेजिंग अॅप’ने घेतल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षांपर्यंत २० ते २५ संदेश यायचे ते आता एकदम दोन-चारवर आले, असा अनुभव अनेकांना आला.
केंद्र सरकारने एसएमएसवर विविध प्रकारची बंधने लादण्यास सुरुवात केली. त्याच वेळी भारतात व्हॉट्स अॅपने मोफत मेसेिन्जग सेवा सुरू केली. त्यांच्या या मेसेिन्जग सेवेमुळे लोकांना कितीही शब्दांचे मेसेजेस अगदी मोफत पाठवता येऊ लागले. यात फोटो, व्हीडिओही शेअर करता येऊ शकतात. यामुळे याची प्रसिद्धी खूप होऊ लागली आणि लोकप्रियता वाढली. आता असे अनेक अॅप मार्केटमध्ये आल्याने एसएमएसचा बाजार थंडावला आहे.
ल्ल २०१२ च्या आíथक अहवालानुसार, व्होडाफोनचा पहिल्या तिमाहीत एसएमएसचा व्यवसायात २२ टक्क्य़ांनी घटली. तर भारती एअरटेलाही ३० टक्क्याने घट सोसावी लागली.
ल्ल २०१३ मध्ये एसएमएसच्या व्यवसायात ८० ते ८५ टक्क्यांनी घट झाल्याचे आढळून आले.
ल्ल ग्रामीण भागात आजही एसएमएसचे प्रमाण ६० टक्के आहे. त्यामुळे कंपन्यांनी आता ही सेवा केवळ ग्रामीण भागात सुरू ठेवण्याचा विचार चालवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा