मुंबईः एअर कार्गोमधून बेडशिटच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करीचा प्रयत्न महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने हाणून पाडला आहे. या कारवाईत सुमारे १६ लाख परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत अडीच कोटी रुपये आहे. याप्रकरणी सीमाशुल्क दलालाला डीआरआयने शनिवारी अटक केली. यापूर्वी डीआरआयने न्हावा शेवा बंदरातून एका कंटेनरमधून पावणे सहा कोटी रुपयांच्या सिगारेट जप्त केल्या होत्या.
काळुराम कोकणे असे अटक आरोपीचे नाव असून तो मुंबईतील असल्फा गाव परिसरातील रहिवासी आहे. मुंबईतील एअर कार्गो संकुलात दुबईवरून एक पार्सल आले होते. त्यात बेडशीट असल्याचे कागदोपत्री जाहीर करण्यात आले होते. शनिवारी त्यातील वस्तूंच्या तपासणीत त्यात परदेशी सिगारेट असल्याचे निष्पन्न जाले. घटनास्थळावरून १५ लाख ८६ हजार ९६० सिगारेट जप्त करण्यात आल्या असुन त्याची किंमत दोन कोटी ४० लाख रुपये आहे. त्या सिगरेटचे सर्व कागदोपत्री व्यवहार सीमाशुल्क दलाल काळुराम कोकणे मार्फत करण्यात आले होते. त्याला डीआरआयने चौकशीला बोलावले. त्यात एका कंपनीच्या आयात-निर्यात क्रमांकावरून सिगारेटची तस्करी करण्यात आली. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. पण कोकणे याला बेडशिटच्या नावाने सिगारेटची तस्करी होत असल्याचे माहित होते. त्यामुळे त्यांने प्रति किलो मागे १०० रुपये जास्त दलाली आकारली. त्यातील ७० हजार रुपये आरोपींकडून कोकणेला आगाऊ मिळाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या सिगारेट चीनवरून दुबई व दुबईवरून मुंबईत आल्याची माहिती आहे. याबाबत डीआरआय पडताळणी करत आहे.या प्रकरणातील प्रमुख आरोपीची माहिती मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा >>>मुंबई: शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित
नववर्षाच्या पूर्वसंध्येपूर्वी ८ कोटींचे परदेशी सिगारेट जप्त
नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अंमलीपदार्थांसह परदेशी सिगारेटलाही मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांचीही मोठ्याप्रमाणात तस्करी केली जाते. नुकतीच डीआरआयने न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून ३३ लाख सिगारेट जप्त केल्या होत्या. त्यांची किंमत पाच कोटी ७७ लाख रुपये आहे. त्यानंतर एअर कार्गोमधून अडीच कोटींच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
करोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामगिरीने मी प्रभावित झालो होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता ते देतील ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे.-संजोग वाघेरे