वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नेमकी कधी येणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी ही मेट्रो रेल्वे सुरक्षित असावी यासाठी सुसज्ज सुरक्षा यंत्रणा उभारली जात आहे. त्याचाच भाग म्हणून या मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर श्वानपथक आणि स्फोटक तपासणी करणाऱ्या ‘हँड हेल्ड एक्स्प्लोजिव्ह डेटेक्टर’सह एक पथक तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक स्थानकावर श्वानपथक असणारी ही पहिलीच मेट्रो रेल्वे असणार आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. २००६ मध्ये या मार्गाच्या कामाची सुरुवात झाली. पण तेव्हापासून दरवर्षी प्रकल्प पूर्ण होण्याचे नवीन मुहूर्त जाहीर करायचे आणि नंतर ते बदलत मुदतवाढ देत राहायची हा खेळ सुरू आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये वसरेवा ते विमानतळापर्यंतच्या टप्प्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरू केला जाईल, असे मे महिन्यातील चाचणीवेळी जाहीर करण्यात आले होते. पण आता तो मुहूर्त हुकला आहे आणि आता जानेवारीत वसरेवा ते घाटकोपर हा पूर्ण टप्पा एकाच वेळी सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच धावत्या गाडीतील प्रत्येक डब्यातही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. असे ७०० सीसीटीव्ही कॅमेरे मेट्रो रेल्वेत असणार आहेत. त्यामुळे स्फोटके, हत्यारे घेऊन कोणीही प्रवास करू शकणार नाही शिवाय स्थानकावर ती ठेवणे शक्य होणार नाही. त्याचबरोबर प्रवाशांच्या झटपट तपासणीसाठी ‘हँड हेल्ड एक्स्प्लोजिव्ह डेटेक्टर’ही असणार आहेत.
मॉन्ट ब्लँकचा १२  मजला आगीत खाक
उष्णता आणि धुराशी झुंज..

Story img Loader