महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९व्या शतकापासूनच्या महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास लिहिण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प दोन खंडांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.पहिल्या खंडात १८०० ते १८५७ पर्यंतचा, तर दुसऱ्या खंडात १८५७ ते १९४७ पर्यंत व स्वातंत्र्योत्तर ते आजवरच्या कालखंडाचा समावेश असणार आहे.
या प्रकल्पासाठी मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी एका समितीची स्थापना केली
आहे. या समितीत अरुण साधू, नंदा खरे, सतीश काळसेकर, डॉ. गो. मा. पवार, डॉ. विलास खोले, डॉ. अरुणा ढेरे, अर्जुन डांगळे, दिनकर गांगल, राजा दीक्षित, डॉ. अशोक चौसाळकर, सुहास पळशीकर, अभय टिळक, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचा समावेश आहे.
 पहिल्या आणि दुसऱ्या खंडाचे संपादक म्हणून अनुक्रमे डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. नागनाथ कोतापल्ले हे काम पाहणार आहेत.
राजकीय स्थित्यंतर, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तन याचा आढावा घेण्यात येणार आहे.   १९व्या शतकातील १८५७पर्यंतच्या स्थित्यंतराचाही सविस्तर आढावा यात घेण्यात येणार आहे. या दोन खंडांमधून गेल्या २०० वर्षांमधील महाराष्ट्रात झालेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचा इतिहास उलगडला जाणार आहे.

विविध विषयांचा आढावा
राजकीय स्थित्यंतर, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तन यांचा आढावा घेण्यात येणार आहे.  १९व्या शतकातील १८५७पर्यंतच्या स्थित्यंतराचाही सविस्तर आढावा यात घेण्यात येणार आहे.

Story img Loader