मुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आरोप असलेली समाजमाध्यम प्रभावक (सोशल मीडिया इन्फ्लुईन्सर) सपना गिलसह चौघांना अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर चौघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिल हिची पोलीस कोठडी सोमवारी संपल्याने तिला अंधेरी दंडाधिकारी सी. पी. काशीद यांच्यासमोर हजर करण्यात आले. तिच्यासह तिचा मित्र शोभित ठाकूर, रुद्र सोलंकी आणि साहिल सिंग यांनाही यावेळी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. गिल हिच्याविरोधातील प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) खोटय़ा आरोपांवर आधारित असून तिला याप्रकरणी गोवले जात असल्याचा दावा तिचे वकील काशिफ अली खान यांच्यामार्फत करण्यात आला. तसेच गिल हिच्यासह अन्य आरोपींना जामीन देण्याची मागणी खान यांनी केली.

दुसरीकडे प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याचे सांगून  सरकारी वकील आतिया शेख यांनी गिल हिच्यासह अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला. शॉ याने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिला म्हणूनच आरोपींनी सूड उगवण्यासाठी त्याचा पाठलाग केला.

आरोपींची जामिनावर सुटका झाल्यास ते शॉ याला पुन्हा मारहाण करू शकतात, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media influencer sapna gill get bail in prithvi shaw attack case mumbai print news zws