गुजरातमधील सोहराबुद्दिन बनावट चकमक खटला सर्वोच्च न्यायालयाने मुंबईत वर्ग केल्यानंतर खटल्याची पहिली सुनावणी शुक्रवारी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर झाली. न्यायालयाने समन्स बजावल्याने खटल्यातील मुख्य आरोपी आणि गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा न्यायालयासमोर हजर झाले. मात्र समन्स वेळेत न मिळाल्याने काही आरोपी हजर होऊ शकले नाही. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.  
२००५ मध्ये सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसर बी यांची गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने बनावट चकमकीत ठार केले होते, असा आरोप शहा यांच्यासह १८ आरोपींवर आहे. आरोपींमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आरोपींकडून साक्षीदारांना धमकावण्यात येत आहे, असे स्पष्ट करीत केंद्रीय अन्वेषण विभागाने तो अन्यत्र वर्ग करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. ही विनंती मान्य करीत न्यायालयाने खटला मुंबईत वर्ग केला
आहे.     

Story img Loader