मुंबई : आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संपूर्णपणे समर्थन करतो, परंतु मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेली भूमिका ही ‘सोमय्या व्यवस्थापन’ जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. असे स्पष्टीकरण देत सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने मंगळवारी परवीन शेख यांना नोकरीवरून काढले. शेख यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या व समर्थनार्थ आशय असलेल्या समाज माध्यमांवरील मजकूर आवडल्याचे सूचित (लाईक) केले होते आणि त्यावर आपली मते मांडली होती.

मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या व समर्थनार्थ आशय असलेल्या मजकुरावर आपली मते मांडली होती. यासंदर्भातील वृत्त २४ एप्रिल रोजी एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने शेख यांना चौकशीसाठी बोलाविले. तसेच २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतरही काही दिवस त्यांनी काम करणे सुरू ठेवले. या दरम्यान सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांची चौकशीही सुरु होती. त्यानंतर शेख यांनी सोमवारी (६ मे) लेखी खुलासा सादर केला आणि त्या शेवटपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा न देण्यावर ठाम होत्या. परंतु लेखी खुलासा आणि चौकशी प्रक्रियेनंतर सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने मंगळवारी त्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शेख यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आले. तसेच सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
Devarpade School, Dada Bhuse Visit Malegaon Taluka ,
मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’
Sharad Pawa
संतोष देशमुखांच्या मुलांचं शिक्षण ते कुटुंबाचं संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा
Nana Patole, Nana Patole proposal resign,
Nana Patole : नाना पटोलेंकडून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, म्हणाले…
MLA Sanjay Kute
“माझ्याबरोबर जे घडलंय…”, फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला ‘कूटनीति’चा फटका? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “पक्षाने मला…”

हेही वाचा >>> सीबीआयच्या शोध मोहिमेत सुमारे दीड कोटींची रोकड, सोने जप्त

संस्थेचे म्हणणे काय?

‘ज्ञानदेव तू कैवल्यम्’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समजूतदारपणा वाढविणे आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. परंतु परवीन शेख यांच्या समाजमाध्यम खात्यावरील पोस्ट, प्रतिक्रिया आदी आम्ही जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि सखोल विचार केल्यानंतर व्यवस्थापनाने परवीन शेख यांचे संस्थेशी असलेले संबंध संपुष्टात आणले आहेत. जेणेकरून एकता आणि सर्वसमावेशकता या आमच्या मूल्यांशी तडजोड होणार नाही.

परवीन शेख यांचे म्हणणे काय?

मला मुख्याध्यापिका पदावरून दूर करीत नोकरीवरून काढल्याची बातमी कळल्यावर धक्का बसला. यासंदर्भात मला दिलेली नोटीस ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. ही कारवाई माझ्या विरुद्ध केलेल्या खोट्या आरोपांवर आधारित आणि बदनामीकारक आहे. मुख्याध्यापिका म्हणून मी केलेले काम हे उत्तम आहे आणि अशा पद्धतीने मला पदावरून हटविणे हे अन्यायकारक आहे. गेली १२ वर्षे मी सोमय्या शाळेसाठी अथक परिश्रम घेतले आणि शाळेच्या विकासासाठी योगदान दिले. परंतु माझ्याविरुद्ध चालविलेल्या गेलेल्या या अतिशय विचित्र मोहिमेत माझ्यामागे उभे न राहता संस्थेने कारवाईचा निर्णय घेतला. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते. माझा न्यायव्यवस्थेवर आणि भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे. या कारवाईनंतर कायदेशीर लढा देणार आहे.

Story img Loader