मुंबई : कुर्ल्याच्या खैराणी रोड परिसरात असलेल्या काही गोदामांना शनिवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक गोदामे जळून खाक झाली आहेत.

शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास खैराणी रोड येथील वाजीदअली कंपाऊंड परिसरात ही भीषण आग लागली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, लाकूड, ज्वलनशील पदार्थ आणि भंगाराची गोदामे आहेत. शनिवारी पहाटे त्यातील एका गोदामात आग लागली. आगीची माहिती मिळताच तेथील कामगारांनी बाहेर पळ काढला आणि तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या ११ गाड्या तेथे दाखल झाल्या होत्या.

Rain in Mumbai in winter Mumbai print news
ऐन थंडीत मुंबईत पावसाचा शिडकावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
ubt chief uddhav thackeray will reconsider contesting bmc elections independently vijay vadettiwar
ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेसची नमती भूमिका!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Mumbai revenge crime
Mumbai Revenge Crime : मुंबईत बदला घेण्यासाठी तरुणाचे अपहरण, अर्धनग्न व्हिडिओ काढायला भाग पाडून लाखोंची लूट; दोघांना अटक
karad gukha seized
कराड : तासवडे पथकर नाक्यावर १० लाखांचा गुटखा जप्त
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा…ऐन थंडीत मुंबईत पावसाचा शिडकावा

अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी आकाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत तेथील आठ ते दहा गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने त्या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे.

हेही वाचा…ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेसची नमती भूमिका!

खैराणी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे असल्याने तेथील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी असते. शनिवारी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनाही वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली आहे.

Story img Loader