माया बहुलेकर (६३) या वृद्धेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तिच्या जावयासही अटक केली असून वारंवार भांडण उकरून काढत कटकट करते, या कारणास्तव मानलेल्या मुलास सुपारी देऊन सासुची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.पोलिसांनी २४ तासाच्या आतच मानसपुत्र अनिल रायबोले (३६) यास अटक केली. जावई परेश ठक्कर याच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे त्याने पालिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी परेशची चौकशी सुरू केली. तेव्हा परेशने सासुची हत्येची सुपारी दिल्याची कबुली दिली. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात याप्रकरणी अधिक तपास करीत असून न्यायालयाने आरोपींनी २० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हत्येच्या वेळी चोरण्यात आलेला सोन्याचा हार मात्र अद्याप मिळू शकलेला नाही.
सासुला मारण्याची सुपारी देणारा जावई अटकेत
माया बहुलेकर (६३) या वृद्धेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तिच्या जावयासही अटक केली असून वारंवार भांडण उकरून काढत कटकट करते, या कारणास्तव मानलेल्या मुलास सुपारी देऊन सासुची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.
First published on: 15-12-2012 at 03:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son in law has been detained for giving supari for his mother in law