मुंबई: लग्नात झालेला खर्च परत मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींनी जावयाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याची घटना गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजी नगर पोलिसांनी जावयाची सुटका करून याप्रकरणी तिघांना अटक केली.

गोवंडीमधील शिवाजी नगरमध्ये वास्तव्यास असलेला रिक्षाचालक अक्रमअली कुरेशी (२४) याचा वर्षभरापूर्वी वसई येथील सकिना नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी या दोघांमध्ये वाद सुरू झाले. नेहमीच्या वादाला कंटाळून सकिना पतीला सोडून तिच्या माहेरी वसई येथे निघून गेली. अनेक महिने उलटल्यानंतरही ती सासरी जात नसल्याने तिच्या वडिलांनी आणि इतर नातेवाइकांनी अक्रमअलीला भांडणाचे कारण विचारण्यासाठी मानखुर्द परिसरात बोलावले. ठरल्याप्रमाणे अक्रमअली आणि त्याच्या सासरची मंडळी भेटली. त्यावेळी अक्रमअली आणि सासऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांनी अक्रमअलीचे अपहरण केले आणि त्याला वसई येथे नेले. तेथील एका बंद खोलीत त्याला डांबून ठेवण्यात आले. तसेच लग्नासाठी झालेला खर्च परत करण्याची मागणी त्याच्याकडे करण्यात आली.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Cheating with the lure of a young woman in Ganjajmun Nagpur news
गंजाजमुनात मौजमजा करायला आला अन् सुंदर तरुणीच्या आमिषाने फसला
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी

हेही वाचा – सूर्या प्रकल्पातील दुर्घटना : व्हिजेटीआयमधील प्रा. अभय बांबोळे यांच्यामार्फत चौकशी करणार

हेही वाचा – जया शेट्टी खूनप्रकरणी छोटा राजन दोषी, न्यायालयाकडून उद्या शिक्षा सुनावली जाणार

अक्रमअलीच्या आईला ही बाब समजल्यानंतर तिने शिवाजी नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शिवाजी नगर पोलिसांनी वसई येथे जाऊन अक्रमअलीची सुटका केली. त्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सासरे आणि इतर दोघांना अटक केली.