आजारपणाचा खर्च न झेपल्याने कृत्य
वृद्ध आईच्या आजारपणाने त्रस्त झालेल्या मुलाने तिची हत्या केल्याची घटना कुलाबा येथे उघडकीस आली आहे. राम कीर (५५) असे या मुलाचे नाव आहे.
कुलाब्याच्या राजवाडकर मार्गावरील कुलाबावाडी येथील शनिदेव अपार्टमेंटमध्ये राम कीर आई सरस्वती (८०), पत्नी आणि २० वर्षीय मुलीसमवेत राहतो. पाच वर्षांपूर्वी तो आखाती देशात एका हॉटेलात काम करत होता. तेथून परतल्यानंतर तो बेरोजगार होता. सरस्वती यांना अर्धागवायूचा झटका आला होता. आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रामला आईचा आजारपणाचा खर्च पेलवत नव्हता. बुधवारी रात्री तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि पत्नी आणि आईला मारहाण करू लागला. पत्नीने स्वत:ची सुटका करून पोलीस ठाणे गाठले. पोलीस येईपर्यंत रामने केलेल्या मारहाणीत त्याची आई सरस्वती मरण पावली होती. घटनास्थळावरूनच रामला अटक करण्यात आली.
मुलाकडून आईची हत्या
वृद्ध आईच्या आजारपणाने त्रस्त झालेल्या मुलाने तिची हत्या केल्याची घटना कुलाबा येथे उघडकीस आली आहे. राम कीर (५५) असे या मुलाचे नाव आहे.
First published on: 15-02-2014 at 12:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son murderd his mother