राजकीय संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांची समजूत काढण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून सुरू झाले आहेत. दिल्लीत कामत यांनी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. कामत बुधवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची कामत यांनी भेट घेतली. पटेल यांच्या सुनेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याकरिता ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. ए. के. अॅन्टोनी यांचीही कामत यांनी भेट घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही कामत भेट घेणार आहेत. या भेटीबाबत काहीही बोलण्यास कामत यांनी नकार दिला.
कामत यांच्या दिल्लीत भेटीगाठी
राजकीय संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांची समजूत काढण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून सुरू झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-06-2016 at 02:45 IST
TOPICSगुरुदास कामत
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi meets gurudas kamat