गायक सोनू निगमला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलकडून धमकीचे दूरध्वनी आले आहेत.
छोटा शकीलने दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा आरोप सोनू निगमने केला आहे. सोनू निगमने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोनू निगमने ज्या कंपनीबरोबर करार केला आहे तो रद्द करून त्यांच्या कंपनीबरोबर करार करण्याचे सांगण्यात आले आहे. जर असे केले नाही तर एका महिलेबरोबर संबंध असल्याचे सांगून बदनामी करण्यात येईल असेही सोनूला धमकावक्यात आले होते.
हे दूरध्वनी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू निगम सध्या भारताबाहेर असल्याने त्यांनी अजून रितसर तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केलेली नाही. दूरध्वनीच्या माध्यमातून निगम यांनी आम्हाला माहिती दिली आहे. ते भारतात आल्यावर तक्रार दाखल करणार आहेत.

Story img Loader