यूजीसीच्या नवीन नियमावलीनुसार महाविद्यालयांमध्ये होणा-या रॅगिंग आणि छळवणूकीच्या घटनांचा अहवाल दर दोन महिन्यांनी मुंबई विद्यापीठाकडे सादर करावा लागणार आहे. यासंदर्भातील माहिती वर्षाच्या सुरूवातीलाच प्रसिध्द करून विद्यार्थ्यांना याबाबात माहिती देण्याचेही आदेश यूजीसीने सर्व विद्यापीठांना दिले आहेत.
मुंबई विद्यापीठाशी सर्व महाविद्यालयांना यापुढे रॅगिंग आणि छळवणुकीसंदर्भात काय पावले उचलली याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे. महाविद्यालयांमध्ये असे प्रकर घडले नाहीत तरीदेखिल हा अहवाल सादर करावा लागणार आहे. यामुळे महाविद्यालये याबाबत योग्य ती पावले उचलून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहेत हे सिध्द होईल, असे विद्यापीठाच्या अधिका-यांनी सांगितले.    
यीजीसीच्या यासंदर्भातील नियमावलींची प्रत महाविद्यालयांना पाठवण्यात आली असून, याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी ती प्रत नोटीस बोर्डावर  लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आम्ही लवकरच या नवीन नियमांबाबत एक परिपत्रक काढणार आहोत. विद्यार्थी आणि शिक्षकांना याबाबात पूर्ण माहिती व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठ सर्व महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंड्स सोसायटी’ ही संकल्पना राबवण्याचाही विचार करत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ह्या सोसायटीची स्थापना करण्यात येणार असून वरिष्ठ प्राध्यापक त्याचे काम पाहतील. यामुळे विद्यार्थी त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतील, असं दुस-या एका अधिका-याने स्पष्ट केले.  
विद्यार्थ्यांना नेहमी प्रवेशाबाबत आणि महाविद्यालयाच्या माहितीपत्रकात चुकीची माहिती प्रसिध्द केल्याबात समस्या असतात. त्याचप्रमाणे विशिष्ट जातीच्या वर्गाला प्रवेशप्रक्रियेमध्ये आरक्षण, विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्य़ांची मानसिक आणि शाररिक छळवणूक, पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र मिळवणे, फी या आणखी काही समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते.       
परीक्षा घेण्यामध्ये आणि निकाल लावण्यामध्ये झालेला उशीराबाबतही विद्यार्थी येथे तक्रार करू शकतात.
मुंबई विद्यापीठआची समस्या निवारण समितीची बैठक दर महिन्याला होते. त्यामध्ये पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. त्यासाठी संबंधित महालिद्यालयांच्या प्रचार्यांनाही उपस्थित रहावे लागते, असे मुंबई विद्यापीठाच्या अधिका-यांनी सांगितले.

Story img Loader