जिया खानला आठ महिन्यांपूर्वी मारहाण केली होती, अशी कबुली तिच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सूरज पांचोली याने पोलिसांकडे दिली. 
आठ महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये आपण जिया खानला मारहाण केली होती, असे सूरजने सांगितले. जियासोबत आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होतो, अशी माहिती सूरजने या अगोदरच पोलिसांना दिलीये. सूरजच्या कबुलीनंतर आता त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९८-अ नुसारही गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. विवाहितेची नवऱयाकडून किंवा सासरच्या मंडळींकडून छळवणूक केल्याबद्दल या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.
जुहूमधील ज्या रुग्णालयात जिया खानने गर्भपात केला होता. तेथील वैद्यकीय अहवालही पोलिसांनी ताब्यात घेतलाय. गर्भपातासाठी मिळणाऱया गोळ्या घेऊन जियाने गर्भपात केला नव्हता. जियाचा गर्भपात करणाऱया डॉक्टरांवर आणि हे माहिती असलेल्या तिच्या मित्र-मैत्रिणींना पोलिसांनी समन्स बजावले आहे, असे पोलिस उपायुक्त चेरिंग दोर्जे यांनी सांगितले.
सूरज आणि जियाची ओळख सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. बऱयाच वेळा जिया सूरजच्या घरी तर सूरज जियाच्या घरी राहात होता. जियाने आत्महत्या करण्याच्या एक दिवसआधी ती सूरजच्या घरी राहिली होती, असेही दोर्जे यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात हे प्रेमीयुगुल गोवा, लोणावळा, खंडाळा येथे राहण्यासाठी गेले होते, अशीही माहिती पोलिसांना मिळालीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा