अक्षय मांडवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्याघ्र-सिंह सफारीसह बिबटय़ा बचाव केंद्रातील कारभारात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न

दोन बिबटय़ांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पिंजराबंद वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत सतर्क झालेल्या बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासना’ने प्राण्यांच्या एकंदरीत नियोजनासाठी प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. त्यामुळे इथल्या व्याघ्र-सिंह सफारीसह बिबटय़ा बचाव केंद्रातील (रेस्क्यू सेंटर) ढिसाळ कारभाराला शिस्त लागण्याची शक्यता आहे.

इथल्या प्राण्यांशी संबंधित घडामोडींची शास्त्रीय नोंद, प्राणिपालांसह व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या नियुक्त्या, त्यांच्यावर असलेली जबाबदारी, नवा प्राणी दाखल झाल्यानंतर त्याची देखभाल, संगोपन कसे करावे आदीची एसओपी तयार केली जाणार आहे. उद्यान संचालकांच्या अंतिम परवानगीनंतर येत्या काही दिवसांमध्ये ती अमलात येईल. यामुळे वन्यप्राण्यांची देखभाल, हाताळणी ही शास्त्रशुद्ध व नियमांच्या चौकटीतच केली जाईल.

गेल्या दोन आठवडय़ांमध्ये राष्ट्रीय उद्यानाच्या बिबटय़ा बचाव केंद्रातील नऊ महिन्यांचा सूरज आणि दहा वर्षांच्या भंडारा या दोन बिबटय़ांचा अचानक मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून दोन्ही बिबटय़ांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. ही विषबाधा अन्नामधून झाल्याचा संशय आहे. या दुर्दैवी घटनेमुळे येथील पिंजराबंद वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्याघ्र-सिंह सफारीसह बिबटय़ा बचाव केंद्राचे नियोजन केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) नियमानुसार होते. ‘सीझेडए’च्या नियमावलींमध्ये समाविष्ट असणारा ‘एसओपी’ मात्र केवळ प्राणिसंग्रहालयांमध्ये वापरली जाते. इथल्या बचाव केंद्राच्या व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र ‘एसओपी’ची आवश्यकता होती.

राज्यातील चार बिबटय़ा बचाव केंद्रांपैकी फक्त जुन्नर येथील माणिकडोह बचाव केंद्राचे व्यवस्थापन या पद्धतीने होते. इतर ठिकाणचा कारभार रामभरोसेच चालू आहे. दोन बिबटय़ांच्या मृत्यूनंतर मुंबईत या कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा विचार राष्ट्रीय उद्यान प्रशासन करीत आहेत. याअंतर्गत सफारी आणि बिबटय़ा बचाव केंद्रात सेन्सर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. तसेच प्राण्यांची हाताळणी, संगोपन, देखभाल याकरिताही प्रमाणभूत कार्यपद्धती वापरली जाणार आहे.

होणार काय?

*  एखादा प्राणी केंद्रात दाखल झाल्यापासून त्याच्या मुक्ततेपर्यंतची प्रक्रिया ‘एसओपी’च्या नियमावलीनुसार होणार

*  प्राण्यांची देखभाल करणाऱ्या प्राणिपाल आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची वेळापत्रकानुसार नियुक्ती

*  प्राणिपालाला प्रत्येक प्राण्याचे दिवसभराचे नियोजन नोंदवहीत नोंदविणे बंधनकारक

*  एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या बाबींचा उलगडा होण्यास नोंदींमुळे मदत

बचाव केंद्र आणि सफारीमधील पिंजराबंद प्राण्यांबरोबरच मानव-प्राणी संघर्षांमधून बंदिवान झालेल्या प्राण्यांच्या अधिवासाबाबत ‘एसओपी’ असणे आवश्यक आहे. यामुळे प्राण्याची हाताळणी आणि त्याचा सांभाळ नियोजन पद्धतीने होईल. तसे ते होणे आवश्यकच आहे.

– विद्या अत्रेय, वन्यजीव संशोधिका