मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे व्यवस्थापन मार्गदर्शक अनिल देसाई आणि तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी उत्सुक असलेले राहुल शेवाळे यांच्यात दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात थेट लढत झाली. १४ लाख ७४ हजार ४०५ मतदारांपैकी ७ लाख ९० हजार ३३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सायन कोळीवाडा, वडाळा, चेंबूर या ठिकाणी मतदारांनी तीन तासांपेक्षा जास्त काळ उन्हातान्हात उभे राहून केलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना धारावी मतदारसंघात सर्वाधिक मतदान होईल, अशी ग्वाही देणाऱ्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात एक लाख २२ हजार ८७० मतदान (४८.५२ टक्के) झाले आहे.

हेही वाचा >>> मागोवा : मराठी-मुस्लीम मतदार निर्णायक

Pune office Income Tax Department, prevent misuse of money,
विधानसभा निवडणुकीतील पैशावर ‘नजर’! प्राप्तिकर विभागाचे सर्व उमेदवारांवर लक्ष; नागरिकही सहभागी होऊ शकणार
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
assembly elections are announced there is a warning to boycott the election polls solhapur news
निवडणूक जाहीर होताच मतदानावर बहिष्काराची इशारेबाजी सुरू; हराळवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्नावर इशारा
illegal Banners in Pune, Pune latest news,
लोकजागर : ‘भावी आमदारां’च्या फलकांना आवरणार कोण?
disciplined party bjp is on the verge of indiscipline
बेशिस्तीच्या वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष
pune politics
भूतकाळाच्या चष्म्यातून…बेशिस्तीचे वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन

महाविकास आघाडीसाठी ही चिंतेची बाब आहे. धारावीचे बदलते वारे पाहून शेवाळे यांनी मी पण धारावीकर मोहीम राबवली होती. वडाळा मतदारसंघात एक लाख १५ हजार ५०८ मतदान झाले आहे. पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी हवी असल्यास मतांची टक्केवारी चांगली राहील यांची काळजी आमदारांनी घेतली आहे. सायन कोळीवाडा भाजपचे आमदार कॅप्टन सेल्वन यांच्या सायन मतदारसंघात एक लाख ४२ हजार १२६ मतदान झाले आहे. जास्त झालेले मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. यावरून निकालाची दिशा ठरणार आहे. ठाकरे यांचे निकटवर्तीय देसाई यांच्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी अनेक सभा तसेच रोड शो केले. शिवसेनेसाठी महत्त्वाचा असलेला दादरचा परिसर याच मतदारसंघात येतो.

अणुशक्तीनगर, वडाळा, धारावी, चेंबूर हे विधानसभा मतदारसंघ कष्टकऱ्यांच्या वसाहती आहेत. भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलणार हा प्रचार या मतदारसंघातील दलित मतदारांच्या मनावर बिंबवण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला. अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक हे तटस्थ राहिल्याने येथील मुस्लीम समाजाचा कल कुठे झुकणार याची उत्सुकता आहे. माहीम मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि मनसे यांची संमिश्र ताकद आहे. मनसेचे पदाधिकारी वगळता कार्यकर्ते किती फिरले यावर महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित जुळणार आहे. माहीम मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला आहे.