मुंबई – दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील धूसफूस आता वाढत चालली असून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेसाठी माजी खासदार अनिल देसाई यांचे नाव समाजमाध्यमांवरून जाहीर केले आहे. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. बुधवारी शिवसेनेने सिद्धीविनायक मंदिरापासून पहिली प्रचार फेरीही सुरू केली. या मतदारसंघावर दावा करणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची खदखद त्यामुळे वाढू लागली आहे. कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाविकास आघाडीत मतदारसंघांच्या जागेवरून अद्याप खलबते सुरू आहेत. त्यातही मुंबईतील सहापैकी तीन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. तर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत उमेदवार अद्याप अधिकृपणे जाहीर झालेले नाहीत. मात्र दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाने समाजमाध्यमांवरून माजी खासदार अनिल देसाई यांचे नाव आधीच जाहीर केले आहे. बुधवारी देखील आमदार आदित्य ठाकरे यांनीही समाजमाध्यमांवर अनिल देसाई यांचे नाव जाहीर केले आहे. तसेच बुधवारी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनिल देसाई यांची प्रचार फेरी काढली होती. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन तिथून ही प्रचार यात्रा काढण्यात आली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून देसाई हे कार्यकर्त्यांसह विविध ठिकाणी वसाहतींमध्ये जाऊन गाठीभेठी घेत आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने नाव जाहीर करून प्रचारही सुरू केल्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद असून ती वाढत चालली आहे.

हेही वाचा – मुंबई पोलिसांकडून ९ सोमालियन चाच्यांना अटक

कॉंग्रेसला उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई हे मतदारसंघ सोडण्याचा ठाकरे गटाचा विचार असून दक्षिण मध्य स्वतःकडे ठेवण्याचा विचार आहे. त्यावरून कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता ठाकरे गटालाच लक्ष्य केले आहे. दक्षिण मध्य मुंबईत कॉंग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचे नाव चर्चेत असून त्यांना उमेदवारी मिळावी अशी कॉंग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वर्षा गायकवाड यांचे धारावी मतदारसंघात वर्चस्व आहे. सायन कोळीवाडा, चेंबूर, माहीम परिसरात कॉंग्रेसचे मतदार आहेत. गायकवाड या माजी शिक्षणमंत्री आहेत, चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांना मिळावा असे मत कॉंग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तसेच हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे वर्चस्व होते. केवळ दोन वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे हे जिंकून आले होते. मात्र शेवाळे हे आता ठाकरे गटात नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाला या मतदारसंघावर पूर्ण दावा करता येणार नाही, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. ठाकरेंना या मतदारसंघात कॉंग्रेसची साथ हवी पण कॉंग्रेसला मतदारसंघ द्यायचा नाही, असेही बोलले जात आहे.

दिल्लीतील निर्णयामुळे निर्बंध

ठाकरे गटाचे सगळे निर्णय हे मुंबईच्या स्तरावरच होतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हे सोयीचे असते. मात्र कॉंग्रेसचा कोणताही निर्णय दिल्लीतून होत असल्यामुळे आम्हाला मर्यादा येतात, असेही कार्यकर्ते सांगतात. उमेदवाराचे नाव जाहीर करणे असो किंवा प्रचाराला लागायचे की नाही हे ठरवायचे असले तरी दिल्लीतून येणाऱ्या निर्णयाची वाट पाहावी लागते. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते शांत असून ठाकरे गटाने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे.

उद्धव ठाकरेना आघाडीपेक्षा अहंकार महत्वाचा वाटतो काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा आरोप

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात सेना भवन आहे त्यामुळे या मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केलेला असल्याचे सांगितले जात आहे. मग उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास ज्या मतदारसंघात येते तो उत्तर मध्यचा मतदारसंघ ठाकरे यांना का नको, असा सवाल कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे. शिवसेना भवन परिसरातून एक नगरसेवकही निवडून आणू शकले नाही आणि आता त्यांनी लोकसभेवर दावा केला, असाही तिखट सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

शिवसेना भाजपशी थेट लढण्यास घाबरली आहे का? शिवसेना कधीही स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढली नाही, त्यांची व्होटबँक त्यांना माहीत नाही. माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासारखा प्रबळ दावेदार असतानाही काँग्रेसने मोठे मन ठेवून दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला दिली. शिवसेनेला बोट दिले तर हातच नव्हे गळा पकडतात, असाही टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.