मुंबई : बुलेट ट्रेनसाठी जागेचा आग्रह धरणार, मुंबईकरांवर तुमचे प्रेम आहे असा दावा करता तर कांजूरमार्गला मेट्रो कारशेड, माहुलला पिम्पग स्टेशन आणि धारावीच्या पुनर्विकासासाठी जागा का देत नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार व भाजपला शनिवारी केला. मुंबईचे महत्त्वाचे प्रकल्प रखडण्यास मुख्यमंत्र्यांनी भाजपला जबाबदार धरले.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो २ अ (दहिसर ते डी.एन. नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या वेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली. सोहळय़ाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात न आल्याने नाटय़ रंगले होते. भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. लोकार्पण सोहळय़ात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री यांनी हाच मुद्दा पकडत विरोधकांना उत्तर दिले. जे केले ते आम्ही केले असे म्हणणाऱ्यांनी काय केले ते लोकांनी पाहिले आहे. रातोरात झाडांची कत्तल केलेली पाहिली. आम्ही मात्र पर्यावरणाचे संतुलन राखत विकास करण्यास प्राधान्य देत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रोचे लोकार्पण करत पायाभूत सुविधा विकासाची गुढी उभारण्यात आली. आजचा दिवस मुंबईकरांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. अशा वेळी राजकारण नको. नको ती चर्चा नको. लक्ष वळविण्याचा हा प्रयत्न आहे. कुठलाही प्रकल्प झोकून दिल्याशिवाय उभा राहत नाही. तेच आज दिसत आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस यांच्यावर टीका केली.
पुढील वर्षी अनेक प्रकल्प सुरू
दोन वर्षांपूर्वी जगावर करोनाचे संकट ओढवले आणि अचानक संपूर्ण जग ठप्प झाले. मुंबई आणि एमएमआरमधील विकास प्रकल्पही ठप्प झाले. पण विकास थांबू नये म्हणून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करत प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळेच आज मेट्रोच्या दोन मार्गिका पूर्ण होऊन सेवेत दाखल झाल्या आहेत. आता पुढील वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई सागरी महामार्ग (कोस्टल रोड) सुरू होईल. आतापर्यंत या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामास गती देत काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. त्याच वेळी मुंबई पारबंदर प्रकल्पाचे ६४ टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२३ मध्ये हा प्रकल्प सुरू होईल. रस्ते वाहतूक मजबूत करण्याच्या दृष्टीने २०२७ पर्यंत मुंबईत १० हजार इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येतील, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
लोकार्पण झालेला टप्पा मेट्रो २ अ
दहिसर ते आरे : एकूण लांबी १०.९० किमी
एकूण स्थानके १० : आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा, दहिसर (पूर्व)
मेट्रो ७ दहिसर ते आरे; एकूण लांबी ९.८२ किमी
एकूण स्थानक ९ : दहिसर, आनंद नगर, कंदारपाडा, मंडापेश्वर, एक्सर, बोरिवली (पश्चिम), पहाडी एक्सर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी
- मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी बंगळुरू येथील एका कंपनीकडून ८४ गाडय़ांची अर्थात ५७६ डब्यांची बांधणी
- यातील ११ गाडय़ांचा मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी वापर
- वर्षभरात आणखी २० गाडय़ा होणार दाखल
- ६ डबे, एकूण डबे ६६
- एका गाडीची प्रवाशी क्षमता २२८०
- देशी बनावटीच्या स्वयंचिलत अर्थात विना चालक चालणाऱ्या गाडय़ा
- ताशी वेग ८० किमी, मात्र सध्या ताशी ७० किमी वेगाने धावणार मेट्रो
देशी बनावटीच्या मेट्रो गाडीची वैशिष्टय़े
सर्व डबे वातानुकूलित असून यात स्वयंचलित दरवाजे आहेत. अद्ययावत पॅसेंजर इन्फॉर्मेशन यंत्रणाही यात कार्यान्वित आहे. अद्ययावत अग्निरोधक यंत्रणा असलेल्या गाडय़ा.
- वेळापत्रक : सध्या काही दिवस सकाळी ६ ते रात्री १० यावेळेत मेट्रो धावणार
- मूळ वेळापत्रकानुसार पहाटे ५ ते रात्री १२
- डहाणूकरवाडी स्थानकातून ५ वाजून ७ मिनीटांनी तर आरे मेट्रो स्थानकातून ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणार पहिली गाडी
- शेवटची गाडी डहाणूकरवाडी येथून रात्री १० वाजून ३९ मिनिटांनी तर आरेतून रात्री ११ वाजून २२ मिनीटांनी
- प्रत्येक १० मिनिटे ३७ सेकेंदाने धावणार मेट्रो
- सायकल ठेवण्यासाठी प्रत्येक डब्यात दोन स्टॅण्ड
तिकीट दर : १० ते ५० रुपये, ० ते ३ किमी – १० रु, ३ ते १५ किमी -२० रु १२ ते १८ किमी-३० रु १८ ते २४ किमी- ४० रु २४ ते ३० किमी -५० रु
महिलांसाठी राखीव डबा : लोकलप्रमाणे मेट्रो २ अ आणि ७ मध्येही महिलांसाठी विशेष सोय असणार आहे. सहा डब्यांच्या मेट्रो गाडीतील एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे. या डब्यावर केवळ महिलांसाठी असे चिन्ह असणार आहे.