‘मी सराईत गुंड नाही, माझा चेहराही तसा नाही.’ असे स्पष्टीकरण करण्याची वेळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विधानसभेत आली. त्यांच्या कथित हावभाव व इशाऱ्यांमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली आणि सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूबही करावे लागले. अखेर, ‘तुम्ही मंत्री आहात, याचे भान ठेवा, ’ अशी समज  अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना द्यावी लागली. तेव्हा गोंधळ मिटला.
 छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना, ‘गुजरातला पाणी जाऊ देऊ नये’, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी जलसंपदा मंत्री महाजन हे आपल्या जागेवर बसून काही टिप्पणी करीत होते आणि त्यांनी माजी राज्यमंत्री सतीश पाटील यांच्याकडे पाहून हातवारे केल्याने विधानसभेत  गोंधळ झाला. सराईत गुंडासारखा चेहरा करुन महाजन यांनी पाटील यांना ‘पाहून घेईन’, असा इशारा केला. हे गंभीर असल्याने त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा