फाशी देणे हे देशभक्तीचे काम असून असे काम करण्यास आपण पुढेही तयार आहोत, असे सांगत कसाबला फाशी देणाऱ्याने त्याला राज्य सरकारने जाहीर केलेला पाच हजार रुपयांचा विशेष भत्ता घेण्यास नकार दिला आहे.
कैद्याला फाशी देणाऱ्यास १९६० पासून केवळ १० रुपये विशेष भत्ता मिळत होता. त्यात कुणी वाढही मागितली नाही आणि कधी सरकारनेही तसा निर्णय घेतला नव्हता. मात्र कसाबला फाशी देण्यात आली तेव्हा ही बाब सरकारच्या निदर्शनास आली. त्यानंतर कसाबला फाशी देणाऱ्या कर्मचाऱ्यास पाच हजार रुपयांचा विशेष भत्ता देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला. ती रक्कम त्या कर्मचाऱ्यास देण्यात आली. मात्र कसाबला फाशी देणे हे देशभक्तीचे काम असून त्याचे पैसै नकोत, असे सांगत या कर्मचाऱ्याने ही रक्कम परत केल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात सांगितले
कसाबला फाशी देणाऱ्याने विशेष भत्ता नाकाराला
फाशी देणे हे देशभक्तीचे काम असून असे काम करण्यास आपण पुढेही तयार आहोत, असे सांगत कसाबला फाशी देणाऱ्याने त्याला राज्य सरकारने जाहीर केलेला पाच हजार रुपयांचा विशेष भत्ता घेण्यास नकार दिला आहे.
First published on: 07-12-2012 at 06:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special allowance refused by hangman of kasab