मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार उद्भवू आणि पसरू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. राज्यातील समस्याग्रस्त भागांमध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप समस्याग्रस्त भाग गडचिरोली तसेच गोंदिया आणि चंद्रपूर येथे विशेष मोहीम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागामार्फत फवारणी मोहीम चालू आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डास नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गांवामध्ये कीटकनाशकाची घरोघर फवारणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ, विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीची दखल

त्याचप्रमाणे तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांच्यामार्फत मोहीम राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गतरक्तनमुने तपासणी अंती हिवताप नसल्याचे आढळल्यास, संशयित ताप रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन एन.आय.व्ही. पुणे तसेच राज्यातील निवडक ४३ सेंटीनल सेंटर येथे विषाणू परीक्षणासाठी पाठविले जातात.

एडिस एजिप्ताय डासांचे नमुनेही विषाणुंचा प्रकार ओळखण्यासाठी एन.आय.व्ही.पुणे कडे तपासणीसाठी पाठविले जातात. उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.घरातील व परिसरातील डासअळया आढळून आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते तर कायमस्वरुपी पाणीसाठ्यामध्ये गप्पीमासे सोडले जातात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special campaign of health department in problem areas for epidemic control mumbai print news amy