मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने बुधवारी (६ एप्रिल) पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांमधील घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. सीबीआयने न्यायालयाकडे अनिल देशमुख यांची १० दिवसांची कोठडी मागितली होती. यावर निकाल देताना न्यायमूर्ती व्ही. सी. बर्डे यांनी हा निर्णय दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीबीआयने कोठडीची मागणी करताना चौकशीसाठी अनिल देशमुख यांना दिल्लीला न्यायचे असल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर अनिल देशमुख आणि त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी न्यायालया चौकशीत कायम सहकार्य केल्याचं सांगितलं. तसेच नुकत्याच शस्त्रक्रियेनंतर ते प्रवास करू शकत नसल्याचं म्हटलं.

“अनिल देशमुख यांना १ ते ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी”

सीबीआयने बुधवारी पीएमएलए कोर्टाच्या परवानगीनंतर अनिल देशमुख यांचा ऑर्थर रोड तुरुंगातून १ ते ११ एप्रिलपर्यंतसाठी ताबा घेतला. याविरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी. डी. नाईक यांनी याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला होता.

हेही वाचा : अनिल देशमुख प्रकरणी ठाकरे सरकारला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख तुरुंगात पडले होते, त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर देशमुखांवर जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. यानंतर सीबीआयने लगेच बुधवारी त्यांची कोठडी घेतली.