मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि आसपासच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मतदान केंद्र व आसपासच्या परिसराची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, मतदान केंद्रावरील स्वच्छतागृहांची स्वच्छता आदी कामांसाठी पालिका प्रशासनाला तब्बल पाच कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सर्व मतदान केंद्र स्थळी स्वच्छता राखण्यासाठी २५ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांअभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेक मतदान केंद्रांवर स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाण्याचीही सोय करण्यात आली नव्हती. या सुविधांअभावी मतदारांसह निवडणुकीच्या कामासाठी तैनात कर्मचाऱ्यांचेही प्रचंड हाल झाले होते. अस्वच्छतेमुळे मतदारांसह कर्माचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, तसेच स्वच्छतेच्या कामात कुठलीही हयगय होऊ नये, यासाठी पालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-हिंदू वारसा हक्क अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू, मुलीला मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही

पालिकेच्या २५ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाख रुपये यानुसार पाच कोटी रुपये विशेष निधी देण्यात आला आहे. मतदान केंद्र आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित विभाग कार्यालयातील घनककचरा व्यवस्थापन खात्यातील सहाय्यक अभियंत्यावर सोपविण्यात आली आहे. मतदान केंद्रांमध्ये प्रसाधनगृह नसल्यास तेथे फिरते प्रसाधनगृह उपलब्ध करण्याची सूचना प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

अन्य कारणांसाठी निधी वापरास मनाई

मतदान केंद्रांच्या स्वच्छतेसाठी गरज पडल्यास आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी या निधीचा वापर करण्याची मुभा विभाग कार्यालयांना देण्यात आली आहे. तसेच, स्वच्छतेसंदर्भातील यंत्रसामग्रीचीही पूर्तता या निधीतून करता येईल. या स्वच्छतेच्या कामाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामास हा निधी वापरण्यास प्रशासनातर्फे सक्त मनाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?

सुविधा काय ?

  • पहाटेपासून घराबाहेर पडलेल्या, तसेच असुविधेमुळे बेजार झालेल्या महिला कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा झाली होती.
  • आगामी विधानसभा निवडणुकीत स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
  • पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे मतदान केंद्रस्थळी स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे
  • प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी व निवडणुकीच्या दोन दिवस आधी आणि नंतर मतदान केंद्रातील प्रसाधनगृहांची स्वच्छता आदी कामे करण्यात येणार आहेत.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special fund of 20 lakhs each to all departmental offices of mumbai municipal corporation mumbai print news mrj