मुंबई : मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांसाठी १० विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी – कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. मात्र यंदा पनवेलपर्यंत लोकल सेवा उपलब्ध नसल्याने येथील प्रवासी, भाविकांचे हाल होणार आहेत.
मध्य रेल्वेवरून सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटून कल्याणला रात्री ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि रात्री ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि पहाटे ४.५५ वाजता कल्याणला पोहोचेल.
कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाणे येथून रात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २ वाजता पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाणे येथून २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री ३ वाजता पोहोचेल.
हेही वाचा – मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सीएसएमटी – बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता सुटेल आणि बेलापूरला रात्री २.३५ वाजता पोहोचेल. सीएसएमटी – बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.४५ वाजता सुटेल आणि बेलापूरला रात्री ३.५० वाजता पोहोचेल. बेलापूर – सीएसएमटी विशेष लोकल बेलापूरहून रात्री १.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २.२० वाजता पोहोचेल. बेलापूर – सीएसएमटी विशेष लोकल बेलापूरहून रात्री २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री ३.०५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.