करोनाचे सावट दूर झाल्याने दोन वर्षांनंतर राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदा सर्वत्र विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे अपघात किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून राज्यातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, अशी लेखी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> काँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार? प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण आत्ता…!”

भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते आहे. याच वर्षी देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दीमुळे झालेल्या अपघाती दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. यासाठी स्थानिक पोलीस, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळे यांच्यात समन्वय साधून एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश संबधित यंत्रणांना देण्यात यावेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यासंदर्भात जनतेला आवाहन करावे, अशीही मागणी आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी केली आहे.