नायगाव येथील भुयारी मार्गाच्या कामानिमित्त वसई रोड आणि भाईंदर दरम्यान शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक करण्यात येणार आहे. शुक्रवारी १० मे रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ५.२५ पर्यंत भाईंदर ते वसई रोड दरम्यान जलद मार्गावर तर शनिवारी ११ मे रोजी जलद मार्गावर दोन्ही दिशेने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री १०.२० (वसई रोड-बोरिवली), ११.५३ (बोरिवली-नालासोपारा), पहाटे ५.०६ (बोरिवली-विरार) आणि ५.२२ (विरार-अंधेरी) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.  तर शनिवारी रात्री १०.२० (वसई रोड-बोरिवली), ११.५३ (बोरिवली-नालासोपारा) या दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकच्या काळात काही मेल-एक्स्प्रेस तसचे उपनगरी गाडय़ा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader