मुंबई : ज्येष्ठ रुग्णांना सहज आणि जलद उपचार मिळावेत यासाठी जी. टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आठवड्यातील दोन दिवस विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ३४ मध्ये प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस हा विभाग सुरू राहणार आहे. या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता जी. टी. रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

६० वर्षांवरील नागरिकांना साधारणपणे रक्तदाब, मधुमेह, स्मृतीभ्रंश यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर दृष्टी कमी होणे, पोटाचे विकार, हृदय विकार अशा समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागते. त्यांना तातडीने उपचार मिळावेत, त्यांच्याकडे डॉक्टरांनी विशेष लक्ष द्यावे यासाठी जी. टी. रुग्णालयात ज्येष्ठ रुग्णांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ३४ मध्ये आठवड्याच्या प्रत्येक बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ज्येष्ठ रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी या विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर कधी उपलब्ध असतील याची सहज माहिती मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीचा त्रास अधिक असल्याने अन्य डॉक्टरांसोबत अस्थिव्यंग तज्ज्ञही या बाह्यरुग्ण विभागामध्ये उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती जी. टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.

17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
pune telemedicine service introduced in remote areas of state
राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
vn desai hospital
मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय

हेही वाचा – टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

हेही वाचा – घर खरेदीदारांसाठी महारेराकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याबरोबरच त्यांना नोंदणी करण्यासाठी व औषधे घेण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र औषध व नोंदणी खिडकी सुरू करण्यात आली आहे. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांना केसपेपर काढण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणी खिडकीवर नोंद करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र नोंदणीपुस्तक ठेवण्यात आले आहे. जेणेकरून या रुग्णांची माहिती सहज उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिकांना उपाचारानंतर सहज औषधे मिळावीत आणि त्यांना औषधांसाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात आल्याची माहिती डाॅ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.

Story img Loader