थकीत मालमत्ता कर तसेच पाणी बिलाच्या वसुलीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने नऊ प्रभाग समिती स्तरावर कार्यकारी अभियंत्यांच्या आधिपत्याखाली विशेष पथके तयार केली असून कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी सर्व पथकाच्या प्रमुखांना दिले आहेत.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे महापालिकेच्या महसुलीचे प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता कर तसेच पाणी बिलांच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने नऊ विशेष पथके तयार केली आहेत. नौपाडा, उथळसर, रायलादेवी, वागळे, वर्तकनगर, कोपरी, माजीवाडा-मानपाडा, कळवा आणि मुंब्रा नऊ प्रभाग समिती स्तरावर कार्यकारी अभियंत्यांच्या आधिपत्याखाली ही पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके थकीत मालमत्ता कर तसेच पाणी बिलधारकांच्या घरी जाणार असून ज्यांनी कर तसेच बिले भरली नसतील त्यांच्याविरोधात मालमत्ता जप्ती तसेच नळजोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा