मुंबई : महादेव बुक बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची(एसआयटी) स्थापना केली आहे. हे प्रकरण बुधवारी माटुंगा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्यवहाराचे आरोप आहेत.याप्रकरणात १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सायबर दहशतवादाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर शुक्रवारी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चार सदस्यांचे एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असल्योच सूत्रांनी सांगितले. हा संपूर्ण गुन्हा महादेव अ‍ॅपशी संबंधीत खिलाडी अ‍ॅपशी संबंधित आहे. याप्रकरणी तक्रारदार प्रकाश बनकर यांनी तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तक्रारनुसार आरोपी चंद्राकर आणि इतर हे मॅच फिक्सिंगमधून नफा कमावण्याच्या अप्रामाणिक हेतूने भारतात आयोजित केलेले प्रमुख क्रिकेट सामने व मालिकांचे निकाल निश्चित करण्यासाठी सक्रियपणे सहभागी आहेत. त्यात परदेशातील साथीदारांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच चंद्राकर मॅच फिक्सिंगसाठी लंडनमधील दिनेश खंबाट आणि चंदर अग्रवाल यांच्यामार्फत काम करतो, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांची नावेही तक्रारीत नमुद करण्यात आली आहेत. तसेच अमित शर्मा नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून बेटिंगची सर्व संकेतस्थळे चालवण्यात येतात. याप्रकरणी आता मुंबई पोलीस तपास करणार आहेत.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा >>>म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत रद्द; लवकरच सोडतीची नवी तारीख जाहीर होणार

आरोपींनी जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत एकूण १५ हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूक केली आहे. आरोपींविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८, १२० (बी), १२ (अ)  जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क), ६६ (फ) अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला होता.