महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेतर्फे ८ डिसेंबर रोजी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.४० वाजता दादर येथून विशेष गाडी सुटणार असून ती सायंकाळी ६ वाजता नागपूरला पोहोचेल. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून विशेष गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जळंब, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी या स्थानकांवर
थांबणार आहे.    

Story img Loader