पश्चिम रेल्वेतर्फे सोमवार, १ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल ते इंदौर दरम्यान एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. त्याचे आरक्षण शनिवारपासून सुरू होणार आहे. मुंबई सेंट्रल येथून ही विशेष गाडी दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि बोरिवली, सुरत, वडोदरा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जन आणि देवास मार्गे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता इंदौर येथे पोहोचेल. या गाडीमुळे मध्य प्रदेश तसेच मुंबईतील अनेक प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Story img Loader