मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण, गोवा आणि दक्षिण भारतात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी आरक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी हजरत निजामुद्दीन येथून २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिरुअनंतपुरम सेंट्रलला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०४०८१ तिरुअनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता सुटेल. रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. या रेल्वेगाडीला कोटा, रतलाम, वडोदरा, उधना, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिवि, मडगाव, कारवार, कुमटा, मुकांबिका रोड, बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मंगलोर, कासारगोड, कन्नूर, कोझिक्कोडे, शोरानूर, त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम आणि वर्कला शिवगिरी येथे थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण १९ एलएचबी डबे असतील.