नवरात्रीच्या अखेरीस गावच्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेने विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 
या निर्णयानुसार मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस या दरम्यान दोन्ही बाजूंनी एकूण चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी वातानुकूलित डबलडेकर असेल. या गाडीचे आरक्षण साधारण दरांतच उपलब्ध असेल.
गाडी क्रमांक ००११२ मडगावहून ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ००१११ लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी ९.०५ वाजता निघून रात्री ९.४० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे आरक्षण आज, शनिवारपासूनच सुरू होणार आहे.
०२००५ अप लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही वातानुकूलित डबलडेकर गाडी २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सुटेल. ही गाडी संध्याकाळी साडेचार वाजता करमाळी येथे पोहोचेल. ०२००६ डाउन करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ५ ऑक्टोबर रोजी करमाळीहून सकाळी ६.०० वाजता सुटून संध्याकाळी ५.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.  ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

special train to konkan for dasara
special train, special train to konkan, loksatta news, loksatta, marathi news, marathi  
कोकणवासीयांसाठी दसऱ्यानिमित्त विशेष गाडय़ा
वातानुकूलित डबलडेकरही धावणार
प्रतिनिधी, मुंबई : नवरात्रीच्या अखेरीस गावच्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेने विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  
   या निर्णयानुसार मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस या दरम्यान दोन्ही बाजूंनी एकूण चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी वातानुकूलित डबलडेकर असेल. या गाडीचे आरक्षण साधारण दरांतच उपलब्ध असेल.
गाडी क्रमांक ००११२ मडगावहून ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ००१११ लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी ९.०५ वाजता निघून रात्री ९.४० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे आरक्षण आज, शनिवारपासूनच सुरू होणार आहे.
०२००५ अप लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही वातानुकूलित डबलडेकर गाडी २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सुटेल. ही गाडी संध्याकाळी साडेचार वाजता करमाळी येथे पोहोचेल. ०२००६ डाउन करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ५ ऑक्टोबर रोजी करमाळीहून सकाळी ६.०० वाजता सुटून संध्याकाळी ५.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.  ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

Story img Loader