मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना अतिरिक्त सुविधा पुरवण्यासाठी आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी वांद्रे टर्मिनस – पालीतानादरम्यान अतिजलद विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०९०९३ वांद्रे टर्मिनस – पालीताना अतिजलद विशेष १० मार्च रोजी वांद्रे टर्मिनसवरून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पालीताना येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०९०९४ पालीताना – वांद्रे टर्मिनस अतिजलद विशेष रेल्वेगाडी १२ मार्च रोजी पालीताना येथून सायंकाळी ५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल.
या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, उधना, वडोदरा, अहमदाबाद, बोटाद, धोला आणि सिहोर स्थानकांवर थांबा देण्यात येईल. या रेल्वेगाडीचे आरक्षण बुधवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.