लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांना विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभव मिळावा यासाठी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

प्रवाशांची गर्दीची समस्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने महाकुंभ २०२५ साठी ४२ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले. सीएसएमटी-मऊ-सीएसएमटी विशेष रेल्वेगाड्यांच्या १४ फेऱ्या, पुणे – मऊ – पुणे विशेष रेल्वेगाड्यांच्या १२ फेऱ्या, नागपूर – दानापूर – नागपूर विशेष रेल्वेगाड्यांच्या १२ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाड्यांच्या ४ फेऱ्या धावणार आहेत. याव्यतिरिक्त, इतर रेल्वे विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अधिकच्या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून जातील. ज्यामुळे प्रवाशांना आणखी सुविधा उपलब्ध होईल.

प्रवासी सुविधा, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना

● मुंबई विभाग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण</p>

● पुणे विभाग – पुणे, दौंड, अहमदनगर, मिरज, कोल्हापूर भुसावळ विभाग – भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, खंडवा

● नागपूर विभाग – नागपूर, बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम, बैतुल, पांढुर्णा

● सोलापूर विभाग – सोलापूर

४२ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन

कोकण रेल्वेमार्गावरून उडुपी ते प्रयागराज जंक्शनदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक ०११९२ / ०११९१ उडुपी – टुंडला जंक्शन – उडुपी महाकुंभ विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०११९२ उडुपी – टुंडला जंक्शन महाकुंभ विशेष १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपीहून निघेल. ही रेल्वेगाडी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता टुंडला जंक्शनला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११९१ टुंडला जंक्शन – उडुपी महाकुंभ विशेष रेल्वेगाडी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता टुंडला जंक्शन येथून निघेल. उडुपी येथे २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१० वाजता रेल्वेगाडी पोहोचेल. या रेल्वेगाडीला बरकुर, कुंदापूर, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, महालना, मदनपूर, जं. प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा या स्थानकावर थांबा दिला जाईल.

Story img Loader