महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या आंबेडकर अनुयायांसाठी मध्य रेल्वे ७ आणि ८ डिसेंबर रोजी तीन विशेष गाडय़ा सोडणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.४० वाजता विशेष गाडी सुटेल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. ७ आणि ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.४० वाजता दादर येथून विशेष गाडी सुटेल आणि ती सायंकाळी ६ वाजता नागपूरला पोहोचेल. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून विशेष गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता नागपूरला पोहोचेल.    

Story img Loader