लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : उन्हाळी हंगामात, सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे रोजी पहाटे ४ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबा आहे. या रेल्वेगाडीला २० एलएचबी डबे असून त्यातील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील.

आणखी वाचा-अफगाणिस्तानच्या दूतावास अधिकारी झाकिया वारदक यांचा राजीनामा

गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी रात्री ८ वाजता पनवेल येथून निघेल. दुसऱ्या दिवशी ती गाडी सावंतवाडी रोडला सकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री ३ वाजता पनवेलला पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा असेल. या गाडीला २० एलएचबी डबे असून यामधील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

शिमगा म्हणजेच होळीच्या आधीपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गर्दी वाढू लागते. त्यामुळे या कालावधीत विशेष गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार यंदाही मार्चपासूनच कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या मार्गावर ६ जूनपर्यंत विशेष गाड्या धावतील.

आणखी वाचा-मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक

दरम्यान, विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी, मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special trains will run from panvel to margaon and sawantwadi mumbai print news mrj
Show comments