मुंबई : ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच या कालावधीत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्यामुळे सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. १५ आणि १७ सप्टेंबर रोजी मुंबईहून कोकणात विशेष रेल्वेगाडी धावेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त सलग सुट्ट्यामध्ये मुंबई ते चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीदरम्यान स्वतंत्र विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली होती. १५ ते १९ ऑगस्टपर्यंत सलग सुट्ट्या आल्याने, मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांतील आरक्षणासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. तर, १४ ऑगस्टच्या रात्रीपासूनच्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा पार केल्याने ‘रिग्रेट’चा संदेश दाखवण्यात येत आहे. ‘रिग्रेट’ हा अनावर गर्दीचा निदर्शक आहे. तसेच, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा लागून आलेल्या सुट्टीमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. सलग सुट्ट्यांचा कालावधी असल्याने, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय मध्य, कोकण रेल्वेने घेतला आहे.

हेही वाचा – मुंबई : दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे अ‍ॅप मंदावले

हेही वाचा – वडपे ते ठाणे जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास मे २०२५ पासून

गाडी क्रमांक ०११४९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव १५ आणि १७ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९ वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता रेल्वेगाडी मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५० मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस १६ आणि १८ ऑगस्ट रोजी मडगाव येथून सकाळी ११ वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबा देण्यात येईल. या रेल्वेगाडीला एकूण २१ एलएचबी डबे असणार आहेत. यात द्वितीय श्रेणी वातानुकूलित २ डबे, तृतीय श्रेणी वातानुकूलित ६ डबे, शयनयान ८ डबे, सामान्य ३ डबे जनरेटर कार १ आणि एसएलआर १ अशी संरचना रेल्वेगाडीची असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special trains will run in konkan on consecutive holidays mumbai print news ssb