मुंबईः मालाड परिसरात मंगळवारी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात चालक दारूच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले. मृत महिला पती व दोन मुलांसोबत त्याच परिसरात राहत होती. शहाना काझमी असे मृत महिलेचे नाव असून त्या मेहंदी क्लासेससाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना रात्री १० च्या सुमारास एका मोटरगाडीने त्यांना धडक दिली.

हेही वाचा >>> Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
bombay hc asks state govt to explain delay in appointing members of maharashtra sc and st commission
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची अद्याप नियुक्ती का नाही ? भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Assembly Elections Shaktipeeth Highway Project Grand Coalition Government
निवडणुकीच्या तोंडावर ‘शक्तिपीठ’ मार्गावर माघार!
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
sndt canceled published recruitment advertisement due to doubtful in reservation provisions
पद भरतीची जाहिरात रद्द, उमेदवारांना मात्र हजार रुपयांचा भुर्दंड

वाहन चालवणाऱ्याने स्वतः त्यांना रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालक अनुप सिन्हा (४५) याला निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मोटरगाडीची तोडफोड केली. तसेच आरोपीलाही मारहाण केली. मालाड पोलिसांनी चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यात चालक दारूच्या अंमलाखाली मोटरगाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे.