भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. शिवाजी कदम (३०) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. सोमवारी दुपारी दहिसरच्या रावळपाडा, गणेश नगरसमोरील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली.
शिवाजी कदम हा भाईंदर येथील राहणारा असून एका वाहतूक कंपनीत काम करतो. दुपारी तीन वाजता कंपनीच्या कामासाठी तो दहिसर येथे आला होता. रस्ता ओलांडत असताना त्याला ट्रकने धडक दिली. जखमी अवस्थेतील गणेशला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader