सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरलेले स्पाइसजेटचे विमान हटविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या घटनेमुळे ३२० विमानसेवांना फटका बसला आहे. सोमवारी रात्रीपासून बुधवारी रात्रीपर्यंत अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घसरलेले विमान हटवण्याचे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी रात्री स्पाइसजेटचे जयपूर-मुंबई हे विमान मुंबई विमानतळावर उतरताना ११.५२ वाजता धावपट्टीवरून घसरले. तातडीचा उपाय म्हणून ५४ विमानांना दुसऱ्या विमानतळावर उतरावे लागले, तर त्याच रात्री ५० विमानसेवा रद्द कराव्या लागल्या. विमानसेवा रद्द करण्याचे प्रकार बुधवार रात्रीपर्यंत सुरूच होते. मंगळवारी दिवसभरात ८१ उड्डाणे आणि मुंबईत येणाऱ्या ७० विमानसेवा रद्द कराव्या लागल्या. मंगळवार रात्र ते बुधवार रात्रीपर्यंत ३५ उड्डाणे आणि मुंबईत येणाऱ्या ४० विमानसेवा रद्द केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घसरलेले विमान हटवण्यासाठीची यंत्रणा ही केवळ एअर इंडियाकडे आहे. एअर इंडियाचा चमू मंगलोर येथील विमानतळावरील घसरलेले विमान हटवण्यात कार्यरत होता. त्यानंतर तो चमू मंगळवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर दुपारनंतर कामाला सुरुवात झाली.

विमान हटवण्याचे काम केव्हा पूर्ण होईल याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस वेळ सांगितली नाही. मुख्य धावपट्टी बंद झाल्यामुळे पर्यायी धावपट्टीचा वापर केला जात असून, सध्या विमानसेवा रद्द करण्याव्यतिरिक्त अन्य व्यवहार सुरळीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.