अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज व उदासीन अखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या येण्याचे निमंत्रणही दिले. तसेच राज ठाकरे रे प्रभू श्रीरामाचे भक्त असून उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना विरोध करू नये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – ‘झोपु प्रकल्पांच्या संयुक्त तपासणीला विरोध नाही’; न्यायालयाने फटकरल्यानंतर किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या भेटीनंतर त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही त्यांना आशीर्वाद देण्याबरोबरच अयोध्या येण्याचे निमंत्रणही दिले. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या वेळी अयोध्या दौरा का रद्द केला, याची सविस्तर माहिती दिली. तसेच अयोध्येला नक्की येणार असे आश्वासनही त्यांनी दिले” असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – बाळासाहेब आणि त्रिशूळ… दोघांचीही एकच मागणी; शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमने-सामने
“राज ठाकरे जर अयोध्येला येत असतील, तर आम्हाला आनंदच आहे. प्रभू राम हे सर्वांचेच आहे. राज ठाकरे हे प्रभू रामाचे सेवक आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना विरोध करू नये”, असेही ते म्हणाले.