राज्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
 या संदर्भात जयवंत जाधव, किरण पावस्कर, हेमंत टकले, रमेश शेंडगे, अनिल भोसले, विक्रम काळे, आदी सदस्यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर राज्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, तसेच क्रीडा प्रशिक्षकांची पदे भरण्यात येतील, असे वळवी यांनी सांगितले. पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुल व्यवस्थापन शासन आपल्या ताब्यात घेणार आहे.
त्या ठिकाणी येत्या चार महिन्यात क्रीडा मार्गदर्शक केंद्र सुरु करण्यात येणार आहे. खेळाडूंना सवलतीच्या दरात फी आकारण्याचाही विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.  
राज्यात १२३ कायम क्रीडा प्रशिक्षक आहेत, ८५ मानधनावर आहेत. तालुकास्तरावर १५२ प्रशिक्षक आहेत. क्रीडा प्रशिक्षकांची पदे आणखी भरली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.