हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसंत ऋ तूत वनं-उपवनं फुलून गेल्याची वर्णनं जुन्या संस्कृत काव्यांमध्ये वाचायला मिळतात. मुंबईतला हल्लीचा वसंत मात्र बऱ्यापैकी दमट-घामट आणि टळटळीत असतो. अशा वेळी, ‘काही मुंबईकर वातानुकूल ‘एटीएम’ केंद्रांत वारंवार जातील म्हणूनच बँकांनी व्यवहारांवर दंडात्मक र्निबध आणले,’ असा एक विनोद सध्या समाजमाध्यमांत फिरत असताना, वातानुकूलित कलादालनांची आठवण सर्वानाच यायला हवी! मुंबईतल्या बऱ्याच गॅलऱ्याही अगदी नवनवीन प्रदर्शनं मांडून, उद्याच्या शुक्रवारपासून (१० मार्चपासून) सर्वासाठी खुली होत आहेत.. त्याबद्दल माहिती घेऊच; पण त्याआधी ‘राज्य कला प्रदर्शना’बद्दल..
दोष चित्रकारांचा नाही, म्हणून..
महाराष्ट्र राज्यस्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांनी दरवर्षी राज्यातल्या चित्र (रेखा व रंगकला), मुद्राचित्रण, शिल्प, छायाचित्र आणि उपयोजित कलावंतांचं स्पर्धात्मक प्रदर्शन भरवण्याची प्रथा सुरू केली, उत्कृष्ट ठरणाऱ्या कलाकृतींना बक्षिसंही दिली जाऊ लागली; त्या मालिकेतलं ५७वं प्रदर्शन ७ मार्चपासून आपल्या ‘जहांगीर’मध्ये सुरू झालं आहे. वास्तविक राज्य सरकारनं ‘महाराष्ट्र ललित कला अकादमी’ उभारून तिथं ‘कलादालन’ या नावाखाली काही व्यवस्था केलेली आहे; पण मुंबईतल्या अन्य कलादालनांच्या तुलनेत ती व्यवस्था हिणकसच ठरत असल्यामुळे तिथं प्रदर्शनं होत नाहीत, राज्याची ‘ललित कला अकादमी’ चित्र-शिल्पादी दृश्यकलांसाठी सुद्धा आहे हेच अनेकांना माहीत नाही आणि अर्थातच (डॉ. सुधीर पटवर्धन रचित ‘बदलती क्षितिजे’ या प्रदर्शनाचा अपवाद वगळता) दादर-प्रभादेवीच्या त्या ‘महाराष्ट्र ललित कला अकादमी’तल्या प्रदर्शनांकडे प्रेक्षकही कमीच फिरकतात. हे सारं जणू गृहीतच धरून, राज्याच्या ललितकला अकादमीचा या प्रदर्शनाशी कोणताही संबंध येऊच न देता आजदेखील राज्य कला प्रदर्शन ‘जहांगीर’मध्येच भरतं. त्याची उस्तवारी राज्य कला संचालनालयातर्फे केली जाते. यंदाही असंच झालं आहे. यंदा २२७ कलाकृती ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या तळमजल्यावरच्या सर्व चारही दालनांमध्ये प्रदर्शित झाल्या असून १५ विजेत्यांमध्ये उदय डावल, सुचेता घाडगे, श्रद्धा पाटील, आशीष ठाकूर, आशीष साळवी, अभिजीत साळुंखे, नितीन साळुंखे, अजय धर्माधिकारी, नानासाहेब येवले आदींचा समावेश आहे. शिवाय, ज्येष्ठ (वय ८९) दृश्यकलावंत अकबर पदमसी यांना राज्य सरकारतर्फे कारकीर्द-गौरवाचा विशेष पुरस्कार यंदा देण्यात आला. पदमसी यांच्याही काही कलाकृतींचं दर्शन इथं होईल. हे प्रदर्शन १३ मार्चपर्यंत खुलं राहणार आहे.
राज्य सरकारचं दृश्यकलांकडे कसं दुर्लक्षच सुरू आहे, याचा आणखी नमुना म्हणजे कला प्रदर्शनातल्या पुरस्कारांची रक्कम- सांस्कृतिक खात्याच्या अंतर्गत रंगभूमी, चित्रपट कलावंतांना मिळणारे पुरस्कार ५० हजार रुपयांचे असतात, राज्याच्याच साहित्य-संस्कृती मंडळातर्फे दिले जाणारे वाङ्मय पुरस्कार अगदी पहिल्याच प्रकाशित पुस्तकासाठी सुद्धा ५० हजार रुपयांचे असतात, पण दृश्य-कलावंतांना राज्यव्यापी स्पर्धेअंती दिले जाणारे पुरस्कार प्रत्येकी फक्त १० हजार रुपयांचे असतात. ‘पुरस्काराची रक्कम नव्हे, मान महत्त्वाचा’ हे ठीक असलं तरी ‘एकाच खात्यातला फरक इतका कसा काय?’ अशी चर्चा होतच राहाते.
अर्थात, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या, बक्षिसं मिळवणाऱ्या किंवा बक्षीस न मिळूनही कलाकृती चांगलीच मांडलेल्या कलावंतांचा यात काहीही दोष नाही.. म्हणून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जहांगीर’मध्ये जायला हवंच!
छायाचित्रांचा ‘फोकस’ उत्सव..
छायाचित्रणाकडे कला म्हणून गांभीर्यानं पाहून अनेक र्वष काम करणारे, प्रदर्शनं मांडून नाव कमावलेले असे अनेक जण आहेत. तरीही छायाचित्र-प्रदर्शनांना मुंबईत (चित्र/ शिल्प/ मांडणशिल्पांच्या तुलनेत) दुय्यम महत्त्व मिळतं. हे किल्मिष दूर करण्यासाठी गेल्या दोन खेपांप्रमाणेच यंदाही मुंबईच्या ‘फोकस फोटोग्राफी उत्सवा’चा प्रयत्न दिसणार आहे. दक्षिण मुंबईतल्या ११ गॅलऱ्या, मध्य मुंबईत भायखळ्याचं ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ तसंच करीरोड-लोअर परळच्या जवळ मथुरादास मिल कम्पाऊंडमध्ये असलेली (अनुपा मेहता यांची) ‘लॉफ्ट’ गॅलरी, त्याही पलीकडे वांद्रे इथली ‘व्हॉट अबाऊट आर्ट’ ही गॅलरी तसंच अनेक महागडय़ा रेस्तराँच्या/ डिझाइन स्टुडिओंच्या भिंती, अशा एकंदर सुमारे २० ठिकाणी फोटोच फोटो मांडले जाणार आहेत. ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ या एकाच गॅलरीत तीन उप-प्रदर्शनंही यंदा पाहायला मिळतील.
अजिबात चुकवू नये अशी तीन प्रदर्शनं यंदा कुलाब्यात आहेत. एक : ‘वास्वो’ या उदयपूरवासी छायाचित्रकाराचं ‘तर्क’ कलादालनात भरणारं प्रदर्शन, दोन : ताजमहाल हॉटेलच्या मागच्या ‘मेरीवेदर रोड’वरल्या ‘चर्चिल चेम्बर्स’मध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘अकारा आर्ट गॅलरी’त जुन्या पिढीतले मगनभाई पटेल यांची छायाचित्रं आणि तीन : चिरोदीप चौधुरी यांचं ‘सिटी अॅज लायब्ररी’ हे – लेखक जेरी पिंटो यांच्या साथीनं भरलेलं प्रदर्शन! यापैकी चौधुरी यांचं प्रदर्शन ‘प्रोजेक्ट ८८’ या गॅलरीत (बीएमपी बिल्डिंग, मुकेश मिलची गल्ली, ‘कुलाबा फायर स्टेशन’चा बसस्टॉप) आहे.
बडोद्याचाही मुंबईकडे ‘मार्च’
बडोदे इथल्या ५०हून अधिक कलावंतांचं एकत्रित प्रदर्शन दरवर्षी मुंबईच्या काळा घोडा भागात, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) ‘कुमारस्वामी हॉल’मध्ये भरवण्याचा शिरस्ता ‘रुख्शान आर्ट’नं गेली काही र्वष पाळला आहे. दरवर्षी मार्चमध्ये, सहसा पहिल्याच आठवडय़ात हे प्रदर्शन भरतं, म्हणून याचं नावही ‘बरोडा मार्च’! यंदाच्या प्रदर्शनात गिरिजेश कुमार सिंग यांनी विटेवर केलेली मनुष्य-शिल्पं, काडेपेटय़ांवर प्रज्ज्वल चौधरी यांनी मांडलेला कलेतिहास, सौमेन दास यांनी दृक्-प्रत्ययवादात केलेले प्रयोग असं बरंच काही लक्षात राहील. अर्थात, यापैकी दास यांच्यासारख्या काही जणांच्या चित्रपद्धती अधिकाधिक पक्क्या होताहेत, असंही लक्षात येईल. संग्रहालयातल्या अन्य उत्तमोत्तम प्रदर्शनांसाठी ७० रुपयांचं तिकीट काढावं लागत असलं, तरी ‘कुमारस्वामी हॉल’मधली प्रदर्शनं नेहमीच कोणत्याही तिकिटाविना मोफत असतात! हे प्रदर्शन १२ मार्च रोजी संपेल.